अभिनेता संजय दत्तबाबत नितीन गडकरींचा गौप्यस्फोट !

अभिनेता संजय दत्तबाबत नितीन गडकरींचा गौप्यस्फोट !

नागपूर – अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर अधारीत असलेला संजू सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘संजू’ चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही संजू सिनेमा पाहिला असून याबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी सिनेमा पाहिला असून खरचं तो खूपच सुंदर सिनेमा आहे. यामध्ये माध्यमे, पोलीस आणि न्यायव्यवस्था यांची मते एखाद्यावर कशा प्रकारे परिणाम करु शकतात हे दाखवण्यात आले आहे. सिनेमा पाहिल्यानंतर मी सुनिल दत्त आणि त्यांचा मुलगा संजय यांची परिस्थिती पाहून डिस्टर्ब झालो असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलत असताना गडकरी यांनी संजय दत्तबाबत एक गौप्यस्फोटही केला असून एकदा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही आपल्याला संजय दत्त पूर्णपणे निरपराध असल्याचं सांगितलं होतं असंही गडकरी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे लेखणीची ताकद एखाद्या अणू बॉम्बपेक्षाही जास्त विध्वंसक ठरु शकते. माध्यमं, पोलीस आणि न्यायालयं यांचे मतंही एखाद्याच्या जीवनावर परिणाम करु शकतात.त्यामुळे माध्यमांनी एखाद्या व्यक्तीबाबत लिहीताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण, अनेक काठिण्यातून आपल्या जीवनाला त्यांनी आकार दिलेला असतो. मात्र, एक छोटीशी गोष्टही त्यांचे जीवन उद्धवस्त करण्यास कारणीभूत ठरू शकते.

COMMENTS