“आगामी काळात मुख्यमंत्री अजितदादा तर मंत्री माझे सासरे व्हावेत !”

“आगामी काळात मुख्यमंत्री अजितदादा तर मंत्री माझे सासरे व्हावेत !”

पुणे – आगामी काळात अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत व दौंडचे माजी आमदार आपले सासरेबुवा रमेश थोरात हे मंत्री व्हावेत अशी इच्छा स्मिता पाटील- थोरात यांनी व्यक्त केली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांच्या कन्या व पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या सूनबाई स्मिता पाटील- थोरात यांनी पुणे जिल्ह्यात प्रथमच जोरदार भाषण करून आगामी काळात राज्याच्या मुख्यमंत्रीपदी अजित पवार तर आपले   सासरे पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार रमेश थोरात हे मंत्रीपदी विराजमान व्हावेत असे म्हणत पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

दौंड तालुक्यातील केडगांव येथे पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने आयोजित केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात हजेरी लावत आपले वडील आर आर पाटील यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. तसेच जिल्ह्याच्या सूनबाई झाल्यानंतर येथील राजकारणात सक्रिय होणार आहात का असं विचारलं असता यावर त्यांनी आपण केवळ सामाजिक कार्यक्रमासाठी आले असून राजकारणातील सक्रीयेतेबाबत आगामी काळाच ठरवेल असं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS