जयंत पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड !

जयंत पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड !

पुणे जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नावाला सुप्रिया सुळे यांनी पसंती दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील मोती बाग या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे.या बैठकीनंतर जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान या बैठकीत शरद पवार पक्षातील नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यानंतर जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः जयंत पाटील यांच्या नावाला पसंती दिली असल्याची माहिती आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे नेते उपस्थित होते.

COMMENTS