राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या  विजयसिंह मोहिते पाटलांना शरद पवार म्हणाले समोरील खुर्चीवर बसा!

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांना शरद पवार म्हणाले समोरील खुर्चीवर बसा!

पुणे – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्यातील दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, नवनिर्वाचित आमदार रोहित पवार, भाजपा नेते विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील तसेच साखर कारखानदार, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार तब्बल सहा महिन्याच्या कालावधीनंतर एकाच मंचावर आले होते. शरद पवार इतर नेत्यांसोबत गप्पा मारत असतानाच विजयसिंह मोहिते पाटील तिथे पोहोचले. विजयसिंह मोहिते पाटील हे व्यासपीठावर येताच शरद पवार यांनी त्यांना समोरील खुर्चीवर बसण्यास सांगितलं. एवढच नाही तर यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा झाली.

COMMENTS