पवार घराण्यात वाद ?, शरद पवार यांचं स्पष्टीकरण !

पवार घराण्यात वाद ?, शरद पवार यांचं स्पष्टीकरण !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर विरोधकांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केली होती. त्यानंतर आज अखेर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून मी निवडणूक लढवत नाही
याचा आनंद आहे. मी 14 निवडणुका लढलो कधीही पराभूत झालो नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे. माझ्याविरोधात वक्तव्य करणारे त्यांची पातळी दाखवून देतात. अशा पद्धतीची वक्तव्ये अपेक्षित नाहीत.तसेच पवार घराण्यात कोणतेही वाद नाहीत, वाद निर्माण करणारे कधीही यशस्वी होणार नाहीत असंही पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान माढा मतदारसंघाविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून मी स्वतः मोहिते पाटलांना आग्रह केला की तुम्ही निवडणुक लढवा.भाजपाने 45 नाही तर 48 जागा जिंकून येतील असं म्हणायला हवं असा टोलाही यावेळी पवारांनी लगावला आहे. तसेच आम्ही कधीही आंबेडकरांशी चर्चा केली नाही. मी आघाडीच्या चर्चेत नसतो.मात्र जवळपास सर्व जागांचे प्रश्न निकाली निघालेत.सैन्याच्या मुद्द्यावर राजकारण आणायचं नाही मात्र निवडणूका जिंकण्याच्या शक्यता नसल्याने एअर स्ट्राईकचा राजकीय वापर केला जात असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे.

COMMENTS