“…तर राष्ट्रवादी पर्यायी सरकारचा विचार करेल !”

“…तर राष्ट्रवादी पर्यायी सरकारचा विचार करेल !”

मुंबई – महाष्ट्रातील विधानसभा निवडणुकींचे निकाल लागल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. विधीमंडळामध्ये विश्वास ठरावानंतर भाजपाचे सरकार कोसळले तर राष्ट्रवादी पर्यायी सरकारचा विचार करेल, असे महत्वपूर्ण वक्तव्य नवाब मलिक यांनी केले आहे.

दरम्यान सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेनं 50-50 चे सूत्र वापरण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षांसाठी वाटून घेण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. यावरुनच आता भाजपा आणि शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला असून दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार का या विषयी चर्चा रंगू लागल्या आहेत.

त्यातच आज मलिक यांनी विधीमंडळामध्ये विश्वास ठरावानंतर भाजपाचे सरकार कोसळले तर राष्ट्रवादी पर्यायी सरकारचा विचार करेल, असे महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

COMMENTS