बिरोबा यांना सुद्बूद्धी देवो, शरद पवारांवरील टीकेनंतर धनंजय मुंडेंकडून गोपीचंद पडळकरांवर हल्ला!

बिरोबा यांना सुद्बूद्धी देवो, शरद पवारांवरील टीकेनंतर धनंजय मुंडेंकडून गोपीचंद पडळकरांवर हल्ला!

मुंबई – शरद पवार हे या महाराष्ट्राल लागलेला कोरोना आहेत. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील, अशी जोरदार टीका भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली. या टीकनेतंर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे. राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की साहेबांवर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो! असं ट्वीट मुंडे यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्या पुण्यात आंदोलन

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या जहरी टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या आंदोलनाची हाक दिली आहे. गोपीचंद पडळकर यांनी शरदराव पवार यांच्याबाबत अतिशय अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केले आहे. राजकारणात मतभेद असू शकतात, मात्र एखाद्या व्यक्तीबद्दल इतक्या खालच्या पातळीवर येऊन असे वक्तव्य करणे, भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीला शोभते का असा सवाल, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी विचारला.

तसेच महाबुध्दीवान… महानिष्ठावान… पक्ष बदलण्याचा अनुभव असलेले गोपीचंद पडळकर हे सडक्या मानसिकतेचा कीडा आहे. अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

काय म्हणालेत गापीचंद पडळकर?

देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत. शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे, असा घणाघात, गोपीचंद पडळकर यांनी केला. तसेच सध्या कोरोना संसर्ग असल्याने पंढरपुरात जर बाहेरील लोक, महाराज मंडळीना प्रवेश नसेल तर आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करु नये. सामान्य शेतकरी कुटुंबातील वारकरी कुटुंबास महापूजेचा मान द्यावा, असंही यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले.

COMMENTS