राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, ‘हे’ पाच नेते शिवसेनेत!

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, ‘हे’ पाच नेते शिवसेनेत!

नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला असून
इचलकरंजीमध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. नगरपालिकेतील गटनेत्यासह ५ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
माताेश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते थाेड्याच वेळात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारीही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे नगरसेवक रवींद्र माने
नगरसेवक भाऊसो आवळे, नगरसेवक रवींद्र लोहार, माजी नगरसेविका गीता जगताप,
माजी नगरसेवक महेश ठोके हे 5 जण शिवसेनेत जाणार आहेत. तसेच यावेळी राष्ट्रवादीचे 15 पदाधिकाय्रांसह राष्ट्रवादीचे सुमारे 80 कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे इचलकरंजीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

COMMENTS