राष्ट्रवादीच्या माजी खासदार कार्यकर्त्यांसह आज करणार शिवसेनेत प्रवेश !

राष्ट्रवादीच्या माजी खासदार कार्यकर्त्यांसह आज करणार शिवसेनेत प्रवेश !

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसस पार्टीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कराण राष्ट्रवादीच्या नेत्या माजी खासदार निवेदिता माने या आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईमध्ये मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे माने यांच्या रुपाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यावरून माजी खासदार माने गट नाराज आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आज निवेदिता माने आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश कराणार आहेत. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघातील आगामी लोकसभा निवडणूक मोठी चुरशीची होणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS