राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर  पक्षाकडून आणखी एक मोठी जबाबदारी?

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर पक्षाकडून आणखी एक मोठी जबाबदारी?

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर पक्षाकडून आणखी एक मोठी जबाबदारी सोपविली जाणार आहे. कोल्हे यांच्यावर आगामी निवडणुकीसाठी राज्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. कारण याबाबत स्वतः माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत दिले आहेत. अमोल कोल्हे हे आता शिरूरपुरते मर्यादित नसून त्यांचा राज्यासाठी विचार सुरू असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे पिंपरी-चिंचवडमध्ये बैठका घेत आहेत. काल पिंपळे गुरव येथील बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी डॉ. कोल्हे खासदार झाल्यापासून भोसरीत आले नसल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या.
त्यावेळी अजित पवार यांनी आपल्या शैलीत कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. आमदार-खासदार होऊन दारोदारी फिरायचे असते की पान टपऱ्यांवर गप्पा मारायच्या असतात? कोल्हे दिल्लीत खासदार म्हणून चांगले काम करत आहेत. शेतकऱ्यांचे, बैलगाडय़ांचे प्रश्न त्यांनी संसदेत मांडले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचे कौतुक पंतप्रधानांनीही केले. आगामी निवडणूक काळात त्यांना शरद पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे यांच्याबरोबरीने राज्यभर फिरायचे आहे.
त्यामुळे केवळ भोसरी-भोसरी करू नका. ते भोसरी किंवा शिरूरपुरते मर्यादित नाहीत असं वक्तव्य अजित पवारांनी यांनी केलं आहे.

COMMENTS