महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ सिनेट निवडणुकीत राष्ट्रवादीचे संपूर्ण पॅनल विजयी !

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ सिनेट निवडणुकीत राष्ट्रवादीचे संपूर्ण पॅनल विजयी !

नाशिक – नाशिकमधल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं बाजी मारली आहे. सिनेटच्या झालेल्या 9 जागांपैकी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं सर्व 9 जागा जिंकल्या आहेत.

या निवडणुकीत सिनेटपदी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मयूर सोनवणे, प्रतिक इंगळे, अभिषेक शिरसाठ यांची निवड झाली. स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्षपदी सागर बेनकी उपाध्यक्षपदी गौरी राणे व आशितोष बागडे तर सचिवपदी आकाश जयसिंगपुरे, सहसचिवपदी आकांक्षा कातकाडे व पुजा घोडके यांची निवड झाली.  दरम्यान मतदानादरम्यानन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही विद्यार्थ्यांमध्ये राडा झाला. त्यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे तणाव निवळला असून या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

COMMENTS