नांदेड – मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा तरुणांचा प्रयत्न !

नांदेड – मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा तरुणांचा प्रयत्न !

नांदेड – नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा युवकांनी प्रयत्न केला आहे. नितीन आगे प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं झाला नसल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नांदेडच्या दौ-यावर आहेत. यादरम्यान नांदेड विमानतळाबाहेर येताच काळे कपडे दाखवून या तरुणांनी मुख्यमंत्र्याचा निषेध केला आहे. हे आंदोलनकर्ते तरुण ताफ्यासमोर अचानक आल्यामुळे अपघात होण्यापासून थोडक्यात बचावले असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान हे सर्वआंदोलनकर्ते हे युवा पँथर संघटनेचे असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले असल्याची माहिती आहे. या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला असून  यापूर्वीही मुख्यमंत्र्याचा ताफा अडवण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी सतर्क राहणं गरजेचं आहे.

COMMENTS