सूडबुद्धीने न्यायालयात अहवाल सादर केला, धनंजय मुंडेंचा गृहमंत्र्यांवर आरोप !

सूडबुद्धीने न्यायालयात अहवाल सादर केला, धनंजय मुंडेंचा गृहमंत्र्यांवर आरोप !

बीड – विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना न्यायालयानं मोठा दणका दिला आहे. जगमित्र नागा सूतगिरणी प्रकरणी तारण असणाऱ्या मालमत्ता विक्री अथवा खरेदी करता येणार नसल्याचा आदेश अंबाजोगाई सत्र न्यायालयाने मुंडे यांना दिला आहे. तसेच मुंडे यांच्यासह इतर आठ जणांच्या मामत्तेवर न्यायालयानं टाच आणली आहे. परंतु ही कारवाई केवळ सूडबुद्धीने केली असून 18 पैकी फक्त सात संचालकांवर कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप मुंडे यांनी गृहमंत्र्यांवर केला आहे.

दरम्यान बीड जिल्हा बँक्चे कर्ज प्रकरण हे 1999 मधील असून मी 2006 मध्ये सूतगिरणीवर संचालक झालो. तसेच गृहमंत्र्यांनी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असून आम्हाला आमचं म्हणणं सादर करण्याची संधीही दिली नसल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद असल्यामुळे मुंडे यांनी त्यांच्यावरच निशाणा साधला आहे.

 

COMMENTS