टोलमुक्त महाराष्ट्राच्या नुसत्या वल्गनाच, समृद्धी महामार्गावर तब्बल 31 टोलनाके !

टोलमुक्त महाराष्ट्राच्या नुसत्या वल्गनाच, समृद्धी महामार्गावर तब्बल 31 टोलनाके !

मुंबई – निवडणुकीच्या तोंडावर टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं. त्यानंतरही राज्यात अनेक मार्गांवरचा टोल सुरूच आहे. असं असताना आता प्रस्तावीत आणि मुख्यमंत्र्यांचा महत्वकांक्षी असलेल्या मुबंई नागपूर समृद्धी महामार्गावर तब्बल 31 टोलनाके असणार आहे. आरटीआयमधून ही माहिती उघड झाली आहे. या 32 टोलनाक्यांवर नागरिकांना तब्बल 1500 ते 2000 रुपये टोल भरावा लागण्याची शक्यता आहे. या टोलधाडीवरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबई-नागपूर सुपर एक्सप्रेस वे अर्थात समृद्धी महामार्गसुमारे 710 किमी लांबीचा महामार्ग आहे. त्याच्यासाठी अंदाजे 46 हजार कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. या महामार्गामुळे मुंबई ते नागुपर हे अंतर 16 तासांएवजी आठ तासांत होणार पूर्ण होणार आहे. 10 जिल्हे, 30 तालुके आणि 354 गावांतून हा महामार्ग जाणार आहे. यासाठी सुमारे 20 हजार 820 हेक्टर जमीन अधिग्रहीत करावी लागणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गाचे काम ऑक्टोबर 2017  ला सुरू करून 2020 पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयतन राहणआर आहे.

COMMENTS