मुंबई महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भाजपला पाठिंबा

मुंबई महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भाजपला पाठिंबा

मुंबई –  मुंबई महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय. भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे वॉर्ड क्रमांक 21 मध्ये पोटनिवडणूक होत आहे.

भाजपने त्यांची सून प्रतिभा गिरकर यांना उमेदवारी दिलीय. शिवसेनेने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यासाठी मंत्री विनोद तावडे आणि भाई गिरकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

दरम्यान, गिरकर कुटुंबियांसोबत शिवसेनेचे पूर्वीपासून चांगले संबंध आहेत, त्यामुळे शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा दिल्याचं कळतंय.

COMMENTS