राज्यात आणखी 16 पासपोर्ट केंद्र सुरु होणार!

राज्यात आणखी 16 पासपोर्ट केंद्र सुरु होणार!

मुंबई – राज्यात आणखी 16 पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय विदेश मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील जनतेला पासपोर्ट काढणे सहज आणि सुलभ होणार आहे. राज्यात पासपोर्ट केंद्रांची संख्या कमी असल्यामुळे केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

या नव्या 16 पासपोर्ट सेवा कार्यालयांमध्ये सिंधुदुर्ग, वर्धा, जालना, लातूर, अहमदनगर, पंढरपूर, सांगली, बीड, मुंबई उत्तर मध्य, मुंबई  दक्षिण मध्य, घाटकोपर, नवी मुंबई, डोंबिवली, पनवेल, नांदेड व जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. या १६ नवीन पासपोर्ट केंद्रांमुळे राज्यात पासपोर्ट केंद्रांची संख्या २७ होणार आहे.

देशातील नागरिकांना सुलभ पद्धतीने पासपोर्ट सेवा मिळावी या उद्देशाने नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, येत्या मार्च २०१८ पर्यंत देशात २५१ केंद्रे सुरू होणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात 16 पासपोर्ट केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

COMMENTS