मोदींनी भूतानच्या राजकुमारांना दिली एक अनोखी भेट !

मोदींनी भूतानच्या राजकुमारांना दिली एक अनोखी भेट !

नवी दिल्ली – भूतानचा राजा, राणी आणि राजकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मोदींनी राजकुमार जिग्मे नॅमगल वांगचुक याला फुटबॉल तसेच एक बुद्धिबळ संच भेट म्हणून दिला. याचे फोटो मोदींनी ट्विटरवर शेअर केला आहे.

यावर्षी जागतिक फुटबॉल फेडरेशनच्या फिफा अंडर -१७ वर्ल्डकप स्पर्धेचे पहिल्यांदाच भारताने आयोजन केले होते.  भूतानचा राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, राणी जेट्सन पेमा वांगचुक आणि प्रिन्स यांच्यासह मंगळवारी भारत दौऱ्यावर आले आहेत. ते चार दिवस भारतात असणार आहेत.

COMMENTS