मनसेला आघाडीत घ्यायचं की नाही ? राष्ट्रवादीनं जाहीर केली भूमिका !

मनसेला आघाडीत घ्यायचं की नाही ? राष्ट्रवादीनं जाहीर केली भूमिका !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एकत्रित विमानप्रवास केला होता. त्यानंतर आगामी निवडणुकीत मनसेला आघाडीत सहभागी करुन घेतलं जाणार असल्याची चर्चा होती. परंतु या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं अखेर पूर्णविराम दिला आहे. याबाबतची भूमिका राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केली आहे.

दरम्यान नवाब मलिक यांनी आगामी निवडणुकीत महाआघाडीत मनसे नसेल असं म्हटलं आहे. राज ठाकरे यांची कार्यशैली आणि पक्षाची विचारधारा पाहता मनसेला महाआघाडीत स्थान दिलं जाणार नसल्याचं नवाब मलिक यांनी जाहीर केलं असल्याची माहिती आहे. त्यामुळे मनसेला महाआघाडीत सामाविष्ट करुन घेण्यासाठी सध्या तरी राष्ट्रवादी उत्सूक नसल्याचं दिसत आहे.

त्याचबरोबर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी देखील मनसेला आघाडीत घेण्यास जोरदार विरोध केला आहे. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राज्यस्तरावर जोरदार विरोध असल्याचं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आघाडीमध्ये मनसेला घेतलं जाणार नसल्याचं सध्या तरी चित्र आहे.

COMMENTS