मनसेच्या नव्या कार्यकारिणीत 10 नेते, 12 सरचिटणीस !

मनसेच्या नव्या कार्यकारिणीत 10 नेते, 12 सरचिटणीस !

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मनसेनं सप्टेंबर 2022 पर्यंत आपली नवी कार्यकारिणी जाहीर केली असून त्यात नेते पदावरून शिशिर शिंदे यांना तर सरचिटणीस पदावरून शिरीष पारकर यांना वगळण्यात आलं आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेतून डावलले गेल्याने शिशिर शिंदे पक्षात दुखावले गेले होते. त्यांनी त्यानंतर पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा देऊन, काम करणं थांबवले होते.

दरम्यान नुकत्याच झालेल्या राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सोहळ्याकडेही शिंदे यांनी यंदा पहिल्यांदाच पाठ फिरवली होती. शिंदे उद्या शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधत, शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शिरीष पारकर यांनीही वैयक्तिक कारण देऊन 5 वर्षांपूर्वीच मनसेचे काम करणं थांबवलं आहे. त्यामुळे यंदा नव्या कार्यकारिणीत शिंदे आणि पारकर यांचा विचार करण्यात आला नाही. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया मनसेनं राबवली आणि त्याचा तपशील आयोगाला सादर केला आहे.

COMMENTS