अनेक आमदार आणि नेते शिवसेनेच्या संपर्कात ?

अनेक आमदार आणि नेते शिवसेनेच्या संपर्कात ?

मुंबई – विविध पक्षातील अनेक आमदार आणि नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संपर्कात असलेले हे सर्व नेते योग्य वेळेची वाट पाहत असून हळूहळू तुम्हाला दिसेल असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच हे नेते कोण अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर-ओवेसी यांच्या युतीवर टोला लगावला आहे. ही युती म्हणजे भाजपाची बी टीम असून दोघे एकत्र आल्यामुळे देशाच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे आत्ता सागू शकत नाही, मात्र ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी विसंगत युती असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेसोबत यायला हवं होतं असं असही राऊत यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS