मंत्रालयाच्या सज्जावरुन “त्या” तरुणाला खाली उतरवण्यात अखेर यश

मंत्रालयाच्या सज्जावरुन “त्या” तरुणाला खाली उतरवण्यात अखेर यश

मुंबई –  मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील सज्जावरून एक तरुण आत्महत्येचा प्रयत्न केला होता. राज्याच्या कृषी मंत्र्यांना भेटण्याचा तो आग्रह करत होता. आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी येऊन त्याला वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले होते. संबंधित तरुणाला खाली उतरविण्यात यश आले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील हा तरुण आहे.  ज्ञानेश्वर साळवे असे त्याचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेतमालाला भाव द्यावा अशी मागणी  ज्ञानेश्वर साळवे याची होती. सहाव्या मजल्याच्या सज्ज्यावर चढू आत्महत्येची धमकी देणाऱ्या ज्ञानेश्वर साळवे याच्याशी  मंत्रालयाच्या खालून संवाद साधला जात होता. पण, हातात काचेचा तुकडा घेऊन ज्ञानेश्वर साळवे आत्महत्येची धमकी देत होता. जवळपास दोन तास हे नाट्य सुरू होते.

दरम्यान, तरुणाला पाहण्यासाठी मंत्रालयाबाहेर प्रचंडी गर्दी झाली होती. मंत्रालयातील सर्व कर्मचारी इमारती खाली जमले होते. घटनास्थळी राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील दाखल झाले होते. मंत्रालायला आग लागल्याच्या घटनेनंतर परिसरात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कायम सज्ज असते. त्यामुळे तरुणाला वाचविण्यासाठी तातडीने यंत्रणा कामाला लागली आणि त्याला वाचविण्यात यशही आले.

 

COMMENTS