45 जागा जिंकण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या शिवसेना – भाजपला धक्का, ‘एवढ्याच’ जागा मिळणार – सर्व्हे

45 जागा जिंकण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या शिवसेना – भाजपला धक्का, ‘एवढ्याच’ जागा मिळणार – सर्व्हे

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 जागा जिंकण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या शिवसेना – भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोकसभा निणडणुकीमध्ये भाजप 21, शिवसेना 14 आणि काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस  ते 7 जागा मिळू शकताकाँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीला 12 ते 13 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना – भाजपनं युती केली असली तरी त्याचा फायदा मात्र दोन्ही पक्षांना होणार नसल्याचा अंदाज एबीपी आणि सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेतून वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान राज्यात 4 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून 23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिल, चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल तर, 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल 7 जागांसाठी मतदान – वर्धा, रामटेक, नागपूर, भंडार – गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ- वाशिम

दुसरा टप्पा –18 एप्रिल 10 जागांसाठी मतदान – बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

तिसरा टप्पा – 23 एप्रिल 14 जागांसाठी मतदान – जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा – 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान – नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, उत्तर मध्य, दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई

COMMENTS