लालू प्रसाद यादवांचा तुरुंगातही थाट, मिळतेय व्हीआयपी ट्रीटमेंट !

लालू प्रसाद यादवांचा तुरुंगातही थाट, मिळतेय व्हीआयपी ट्रीटमेंट !

नवी दिल्ली – चारा घोटाळ्यामध्ये न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर लालू प्रसाद यादव यांची बिरसा मुंडा तरुंगात रवानगी करण्यात आली आहे. लालूप्रसाद यादव या कारागृहात कैदी म्हणून गेले असले तरी त्यांचा थाट मात्र जोरदार सुरु आहे. त्यांना या कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारागृहात त्यांना अनेक सुविधा पुरवल्या जात असल्याची माहिती मिळत आहे.

लालूप्रसाद यादव यांना तुरुंगात वृत्तपत्रे, टीव्ही पुरवण्यात आली आहेत. तसेच कारागृह नियमावलीनुसार लालूप्रसाद यांना आठवड्यातील कामकाजाच्या दिवशी सकाळी आठ ते दुपारी १२ च्या दरम्यान त्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी आहे. तसेच त्यांना काही दिवसानंतर घरचं जेवणही पुरवलं जाणार आहे. काही वर्षांपूर्वी लालू प्रसाद यांच्यावर ह्दयशस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या आहारावर खूप बंधने आहेत.  लालूप्रसाद यांना पहिल्या दिवशी तुंरूगातील जेवण देण्यात आल्याची माहिती पक्षाच्या झारखंड राज्याच्या अध्यक्षा अन्नपूर्णा देवी यांनी दिली आहे.

COMMENTS