दिवंगत जयललितांची संपत्ती कोणाला मिळणार ?  किती आहे संपत्ती ? वाचा सविस्तर

दिवंगत जयललितांची संपत्ती कोणाला मिळणार ? किती आहे संपत्ती ? वाचा सविस्तर

चेन्नईतामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा मुद्दा सध्या गाजत आहे.जयललितांच्या या संपत्तीचा वारस कोण आहे हे अजून स्पष्ट झालं नसून याबाबतची प्रक्रिया कोर्टानं सुरु केली आहे.त्यामुळे ही संपत्ती कोणाला आणि किती मिळणार हे अजून गुलदस्त्यात आहे.

जयललितांची कुठे आणि किती आहे संपत्ती ?

      जयललितांची एकूण संपत्ती ४००० कोटींच्या घरात आहे. त्या राहत होत्या ते घर पोईस गार्डन येथे आहे. याला ‘वेदा निलायम’ असे नाव आहे. २४ हजार स्वेअर फुटांवर २१ हजार स्वेअर फुटांचे बांधकाम आहे. त्याची आजची किंमत 50 कोटींच्या आसपास आहे.  त्यांनी आपल्या आईसह १९६७ मध्ये ही संपत्ती १.३२ लाखांना विकत घेतली होती. तसेच त्यांनी तेलंगणा येथील रंगारेड्डी जिल्ह्यातील जिथीमेथला गावात १४.५० एकर शेत जमीन घेतली आहे. तर तामिळनाडू येथे चेय्यूर आणि कांचीपुरूम खेड्यात ३.४३ एकर जमीन घेतली आहे. तसेच जयललिता यांनी १९६८ मध्ये तेलंगणा येथे आणि चेय्यूर येथे १९८१ मध्ये जागा विकत घेतली होती. त्यांच्या नावावर चार व्यावसायिक इमारती आहेत, त्यात चेन्नईत एक आणि हैदराबाद येथे एका इमारतीचा समावेश आहे.यासह कर्नाटक कोर्टात 28 किलो सोन्याचे दागिने आणि हि-यांच्या दागिन्यांचा समावेश आहे.

कोणाला मिळणार संपत्ती?

जयललितांची ही संपत्ती नेमकी कोणाला मिळणार हे अजून स्पष्ट झालं नसलं तरी त्यांचे बंधू दीपक आणि भाजी दिपा यांचं नाव सध्या आघाडीवर आहे. तसेच त्यांनी आपली दावेदारी सिद्ध केल्यास  त्यांना ही संपत्ती मिळू शकते अशी माहिती जयललितांचे विश्वासू वकील एस जयकुमार यांनी दिली आहे. तसेच त्यांच्याव्यतिरीक्त इतरही काही जणांची नावे चर्चेत असल्याचं ते म्हणालेत. त्यामुळे  ही संपत्ती नक्की कोणाला आणि किती मिळणार हे न्यायालयानं जाहीर केल्यावरच समोर येईल.

जयललिता यांनी आपल्या मृत्यूपूर्वी कोणतंही मृत्यूपत्र अथवा वारसदार म्हणून कोणाचही नाव घोषीत केलं नसल्यामुळे ही संपत्ती सध्या वादाच्या भोव-यात अडकली आहे.

COMMENTS