आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी भारताचे दलवीर भंडारी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी भारताचे दलवीर भंडारी

भारताचे दलवीर भंडारी सलग दुस-यांदा आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिचे न्यायाधीश बनले आहेत. ब्रिटनच्या ख्रिस्तोफर ग्रीनवूड यांच्यासोबतच्या अटीतटीच्या लढतीत त्यांनी हा विजय मिळवला. त्यामुळे दलवीर यांचे देशभरात कौतुक होत आहे.

दलवीर भंडरींनी सुरूवातीच्या 11 राऊंड्समध्ये मोठी आघाडी घेतली होती. त्यामुळे ब्रिटनेने आपले नामांकन मागे घेतले. दलवीर भंडारींना या निवडणुकीत 183 मते मिळाली आहे. यात सुरक्षा परिषदेच्या 15 मतांचाही समावेश आहे. न्यायमूर्ती भंडारी यांचा विजय भारतासाठी एका अर्थाने महत्त्वाचा आहे.कारण हेरागिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांचे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रलंबित आहे.जेव्हा कुलभूषण जाधव प्रकरणा सुनावणी आयसीजेमध्ये सुरू होती, त्यावेळी न्यायमूर्ती भंडारी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

COMMENTS