होय आम्ही कुत्रे आहोत, हितेंद्र ठाकूर यांचं शिवसेना-भाजपला प्रत्युत्तर !

होय आम्ही कुत्रे आहोत, हितेंद्र ठाकूर यांचं शिवसेना-भाजपला प्रत्युत्तर !

विरार – पालघर पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून शिवसेना आणि भाजपची एकमेकांवर जोरदार टीका सुरु आहे. हितेंद्र ठाकूर यांच्यावरही यादरम्यान दोन्ही पक्षांकडून टीका करण्यात आली होती. सेना-भाजपच्या टीकेला अखेर हितेंद्र ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं असून होय आम्ही कुत्रे-मांजरं आहोत असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे. सध्या पालघरमध्ये पातळी सोडून प्रचार सुरु असून तीस वर्षांपासून वफादार कुत्र्यासारखं लोकांबरोबर, मतदारांबरोबर आम्ही इमानदार राहिलो आहोत. त्यामुळे तुम्ही जर कुत्रे-मांजरं म्हणत असाल तर आम्ही वफादार कुत्रे मांजरं आहोत असंही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे.

प्रचार सभेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात हितेंद्र ठाकूरांना कुत्रा-मांजर संबोधून टीका केली होती.  त्यावर ठाकूरांनी उत्तर दिलं आहे. पालघर पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांना शिवसेना-भाजपपेक्षा ‘शिटी’ची सीट आल्याचं चालेल. शिवसेनेला भाजपची सीट आलेली चालणार नाही आणि भाजपला शिवसेनेची सीट आलेली चालणार नाही. त्यामुळे सर्व पक्षाचे कार्यकर्ते, नेते आमच्या पक्षाच्या उमेदवाराला मदत करणार असल्याचा दावाही यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

COMMENTS