हार्दिक पटेल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार ? प्रफुल्ल पटेलांनी घेतली हार्दिकची भेट !

हार्दिक पटेल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार ? प्रफुल्ल पटेलांनी घेतली हार्दिकची भेट !

गुजरातमध्ये पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला पाठिंब्यासाठी अल्टिमेटम दिले आहे. काँग्रेसलाही ओबीसी, दलित आणि पटेल यांची एकत्र मोट बांधताना दमछाक होत आहे. तर हार्दिक पटेल याला भाजपचा पराभव करायचा.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि गुजरातचे प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी काल पाटीदार समजाचा नेता हार्दिक पटेल याची भेट घेतली. हार्दिक पटेल यांनी स्वतः ट्विट करुन याची माहिती दिली आहे. अर्थात ही भेट दिवाळीनिमित्त असल्याचं हार्दिक यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र दिवाळी संपल्यानंतर जवळपास 15 दिवसांनतर दिवाळीच्या शुभेच्छासाठी भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीत काही राजकीय फटाके तर फुटले नाहीत ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काँग्रेसकडून हार्दिक पटेल यांना सकारात्मक उत्तर नाही मिळालं तर हार्दिक पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकतात अशीही शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर हार्दिक उमेदवार उभे करु शकतात अशीही चर्चा आहे. तर दुसरीकडे काँग्रेसवर दबाव वाढण्याची ही खेळी असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

COMMENTS