गुजरातमध्ये काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर, जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

गुजरातमध्ये काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर, जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

गुजरात – विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर  केला आहे. यामध्ये जनतेचं लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यासाठी काँग्रेसनं जनतेला विविध आश्वासने दिली आहेत. त्यामुळे काँग्रेसचा हा जाहीरनामा कितपत प्रभावी ठरणार हे पाहणं गरजेचं आहे.

 पाटीदार समाजाला आरक्षणाचं आश्वासन

या जाहीरनाम्यात पाटीदार समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. यामध्ये पाटीदार आरक्षणावर काँग्रेसनं कलम ३१(सी) आणि ४६ च्या आधारे दलित आणि आदिवासी तसेच इतर मागासवर्गीय समाजाला ४९ टक्के आरक्षण देणार असल्याचं आरक्षण दिलंय.तसेच हे आरक्षण देण्यासाठी याबाबतचं विधेयक विधानसभेत सादर करणार असल्याचं आश्वासन काँग्रेसनं दिलं आहे.

शेतकरी, तरुणांसाठी खास ऑफर

शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोफत वीज, पिकाला आधारभूत किंमत, बेरोजगारी भत्ता, इंदिरा कँटीनद्वारे दहा रुपयात जेवण यांसह अनेक आश्वासने काँग्रेनं जनतेला दिली आहेत. काँग्रेसच्या घोषणापत्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगार तरुण आणि महिला यांच्यासंदर्भात असे ३ महत्वाचे मुद्दे आहेत. शेतकऱ्यांना १६ तास वीज, शेतीसाठी मोफत पाणी देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तरुणांसाठी सरकार नोकरीतील रिक्त जागा भारण्याचे काम पुढील ६ महिन्यात करणार असल्याचे काँग्रेसने यावेळी आश्वासन दिले. तसेच गरीबांसाठी इंदिरा आवास योजनेतंर्गत २५ लाख घरांची देखील यात घोषणा करण्यात आली आहे.

महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष

राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि पिंक ट्रान्सपोर्टची व्यवस्था करण्यात येणार असून महिलांसाठी इमरजेंन्सी सेंटर देखील सुरू करण्याचं आश्वासन काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे.

COMMENTS