गुजरातमधील घनदाट जंगलातील एक मतदार, कोण आहे तो ? तिथे तो एकटाच का राहतो ? त्याच्यासाठी लागतो खास पोलिंग बूथ ! वाचा महापॉलिटिक्सचा खास रिपोर्ट……

गुजरातमधील घनदाट जंगलातील एक मतदार, कोण आहे तो ? तिथे तो एकटाच का राहतो ? त्याच्यासाठी लागतो खास पोलिंग बूथ ! वाचा महापॉलिटिक्सचा खास रिपोर्ट……

अहमदाबाद – लोकशाहीमध्ये निवडणूका आणि मताधिकार ही सर्वात महत्वाची बाब असतो. निवडणूक प्रक्रिया लोकशाहीचा आत्मा मानला जाते. प्रत्येक नागरिकाला मतदान करता यावं यासाठी निवडणूक आयोग सतत प्रयत्नशील असते. याचे सर्वात मोठे उदाहरण  हे गुजरात निवडणुकीत बघायला मिळतयं. राज्याच्या सोमनाथ जिल्ह्यातील बानेज गावात एका मतदारासाठी निवडणुक आयोगाने चक्क मतदान केंद्र उभारले आहे.

बानेज गाव हे ऐतिहासिक स्थळ असून ते जंगलात वसलेलं आहे. हे मतदान केंद्र गुजरातच्या अभिमान मानला जाणा-या एशियाई सिंहाच्या गिर सेंचुरीच्या आतमध्ये आहे.  या सेंचुरीच्या आतमधे जाण्यास कोणालाही परवानगी नाही पण बनेश्वर महादेव मंदिराचे पुजारी महंत भारतदास गुरु दर्शन दास गेल्या अनेक वर्षांपासून येथेच रहात आहेत. बानेज गावातील ते एकमेव मतदार आहेत.

2002 च्या निवडणुकी पासून निवडणूक आयोग या गावात मतदानासाठी संपूर्ण व्यवस्था करते. जेव्हा IamGujarat.com  ची टीमने बानोजच्या बीएलओ चिमनभाई रुपालाकडे पोहोचले तेव्हा ते म्हणाले की,  ” आम्ही प्रत्येक निवडणुकीसाठी मतदान केंद्रे तयार करतो. इतर मतदान केंद्राप्रमाणेच बानेज येथील एका मतदारासाठी संपूर्ण कर्मचारी येतात. यामध्ये मतदान संपेपर्यंत मतदान अधिकारी, दोन निवडणूक एजेंट, एक शिपाई, दोन पोलिस आणि एक सीआरपीएफ कर्मचारी मतदान संपेपर्यत आपले कर्तव्य बजावत असतात. याचा विचार करून गुजरातमध्ये प्रथमच वीवीपीएटी ईवीएमचा वापर केला जाणार आहे, याचाच विचार करुन बानेज गावात मतदानाची प्रक्रिया सांगण्यात आली होती.”

रुपाला यांनी सांगितले की, निवडणुकीच्या एक दिवस आधी, जंगल खात्यातील एका खोलीत मतदान अधिकारी थांबतात, जे मंदिरापासून 100 मीटर अंतरावर आहे. त्याच खोलीत एक दिवस आधी मतदान केंद्र तयार केले जाते.

निवडणूक आयोगाच्या या व्यवस्थापनावर महंत भारत दास म्हणाले, ”एका मतदारासाठी निवडणुक आयोगाच्या या प्रक्रीयेचा भाग व्हायला मला अभिमान वाटतो. ही देशाच्या लोकशाहीसाठी अभिमानाची बाब आहे. निवडणुकीत  100 टक्के मतदान झाले पाहीजे, जसे मी जंगलात राहून मतदान करीत आहे. 2002 पासून मी इथे मतदान करत आहे आणि माझ्यासाठी एक संपूर्ण मतदान केंद्र आहे जे दर्शविते की भारतात लोकशाहीला किती महत्व आहे.”

जंगलात एकट्या राहण्याच्या त्यांच्या अनुभवाविषयी महंत यांनी सांगितले की, “अनेकदा सिंह रात्री मंदिर परिसरात येतात. परंतु आजपर्यंत त्यांनी कोणालाही इजा पोहोचविण्याचा प्रयत्न केला नाही. दिवसा येथे भाविक आणि पर्यटक येत असतात. या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व ही आहे. महाभारताच्या काळात पांडव येथे आले तेव्हा कुंतीला तहान लागली होता, तेव्हा अर्जुनाने जमिनीवर बाण मारुन पाणी काढले होते. तेव्हा पासुन हे जलाशय बनले असून दुष्काळात ही हे जलाशय कधीच सुखात नाही.

 

 

COMMENTS