गुजरात निवडणूक : भाजपकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर

गुजरात निवडणूक : भाजपकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर

गुजरात निवडणुकीच्या सणसंग्रामास चांगलाच जोर चढला असून आज भाजपने आपल्या 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे.

अनेक आमदार भाजपच्या पहिल्या यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे नावही पहिल्या यादीमध्ये आहे. मुख्यमंत्री रूपाणी राजकोट पश्चिममधून निवडणूक लढवतील. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत 70 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे.  गुजरात सरकारमधील वरिष्ठ मंत्री नितिनभाई पटेल मेहसाणा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरतील, तर गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष जीतूभाई वघानी भावनगर पश्चिममधून निवडणूक लढवतील.

 

 

 

COMMENTS