महाविकासआघाडी सरकारची आज परिक्षा, थोड्याच वेळात बहूमत चाचणी!

महाविकासआघाडी सरकारची आज परिक्षा, थोड्याच वेळात बहूमत चाचणी!

मुंबई – थोड्याच वेळात महाविकासआघाडी सरकारची बहूमत चाचणी होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मांडला जाणार आहे. यासाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. तसंच यानिमित्ताने शक्तिप्रदर्शनही केले जाणार आहे. हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला जाणार असला तरी १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा महाविकासआघाडीने केला आहे. त्यामुळे महाविकासआघाडीतील सर्वच आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे.

आजच्या बहुमत चाचणीत गुप्त मतदान होणार नाही. तर हेड काऊंटने चाचणी होणार आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या महाविकासआघाडीचं संख्याबळ : शिवसेना 56+8 अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 54, काँग्रेस 44, सपा 2, स्वाभिमानी शेतकरी 1, बहुजन विकास आघाडी 3, मनसे 1, शेकाप 1, माकप 1, एकूण 170 आमदार तर भाजपचं संख्याबळ : 105 + अपक्ष आणि इतर 11, एकूण 116 आमदार आहेत.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष आणि छोट्या पक्षांसह आघाडीला १७० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे हा ठराव मंजूर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे.

COMMENTS