राज्यपालांची बोरीवली अटल स्मृती उद्यानाला भेट

राज्यपालांची बोरीवली अटल स्मृती उद्यानाला भेट

मुंबई – माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोरीवली, मुंबई येथील अटल स्मृती उद्यान येथे जाऊन वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. अटल स्मृती उद्यान परिसराला भेट देऊन राज्यपालांनी समाधान व्यक्त केले.

राज्यपालांनी अटल स्मृती उद्यानाला भेट देऊन तेथील वाजपेयी यांच्या जीवनावरील दृकश्राव्य प्रदर्शन पहिले. राज्यपालांनी तेथे निर्माण केलेली संसद भवनाची प्रतिकृती पहिली तसेच वाजपेयी यांच्या जीवनावरील आभासी प्रश्नमंजुषेत सहभाग घेतला. यावेळी लदाखचे खासदार ज्याम्यान नामग्याल, खासदार गोपाळ शेट्टी, भाजपचे नेते विनोद तावडे, आमदार योगेश सागर, सुनील राणे उपस्थित होते

COMMENTS