रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर, रेल्वे मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर, रेल्वे मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

मुंबई – गेली अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना रेल्वे मंत्रालयानं आनंदाची बातमी दिली आहे. यापुढे कन्फर्म रेल्वे तिकीट हस्तांतरीत करता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. यापूर्वी कन्फर्म रेल्वे तिकीट हस्तांतरण करता येत नसल्यामुळे प्रवाशांची कोडी होत होती. परंतु यापुढे त्यांना आपले कन्फर्म झालेले तिकीट हस्तांतरित करता येणार आहे.

दरम्यान कन्फर्म झालेले तिकीट नातेवाईकांनाच हस्तांतरीत करता येणार आहे. यामध्ये पती, पत्नी, मुले, आई, वडील, भाऊ, बहिण यांना हे तिकीट हस्तांतरीत करता येईल असा नियम मंत्रालयानं केला आहे. तसेच तिकीट हस्तांतरण करायचं असेल तर २४ तासापूर्वी तिकीट हस्तांतरणाचा अर्ज भरून द्यावा लागणार आहे. त्यानंतरच कन्फर्म तिकीट कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने हस्तांतरीत करता येणार आहे. या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

COMMENTS