नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिंचन घोटाळ्याप्रकरणी नागपूरमध्ये ४ गुन्हे दाखल झाले आहेत. गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले असून यामुळे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये आज विरोधकांचा हल्लाबोल मोर्चा निघाल्या यादरम्यानच दुस-या बाजुला या घोटाळ्याप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नागपूरच्या सदर पोलिस ठाण्यात सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने एकूण 4 एफआयआर दाखल केले. धक्कादायक बाब म्हणजे तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी घोटाळ्याच्या फाईलींवर सह्या केल्याचं उघड झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.गोसेखुर्द प्रकल्पासंदर्भात झालेल्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी हे एफआयआर दाखल करण्यात आले.
वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेखुर्द धरणातून नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील सुमारे २ लाख ५० हजार ८०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून या भागातील जनता ३० वर्षांपासून जास्त काळ शेतीला पाणी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. राज्यातील सिंचन घोटाळ्यात गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचाही समावेश होता.
COMMENTS