आधी नीतिमत्ता शिकून घ्या मग बोला

आधी नीतिमत्ता शिकून घ्या मग बोला

मुंबई : ‘राज्यपालांबद्दल बोलत असताना धमकीची भाषा कोणत्या संविधानात बसते, त्यामुळे आधी नीतिमत्ता शिकून घ्या मग बोला’ असा सणसणीत उत्तर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिले आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाची मुद्दे मांडत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यपाल नियुक्त आमदाराच्या प्रश्नी राज्यपालांनी आम्हाला कोर्टात जाऊ देऊ नये, असे सूचक विधान अजित पवार यांनी केले होते,

याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, ’12 आमदारांच्या मुद्यावर जो काही कायदेशीर निर्णय असेल, तो राज्यपाल घेतील. निर्णय घेण्याच अधिकार हा राज्यपालांचा आहे. त्यांचा निर्णय जर योग्य नसेल तर महाविकास आघाडी सरकारला जो काही निर्णय घ्यायचा आहे ते घेतील’ तसंच, ‘ राज्यपाल हे राज्यघटनेनुसार राज्याचे प्रमुख असून ते मुख्यमंत्र्यांना नेमतात. राज्यपालाच्या नावाने मुख्यमंत्री काम करत असतात. अशा या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे मंत्री धमकीची भाषा वापरताl, हे कोणत्या संविधानात बसते? जी भाषा वापरता ती कोणत्या नीतिमत्तेत बसते, आधी सत्ताधाऱ्यांनी नीतिमत्ता शिकली पाहिजे मग राज्यपालांवर बोलले पाहिजे’ असा सणसणीत टोला फडणवीस यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.

COMMENTS