एकापेक्षा अधिक मतदारसंघातून निवडणुका लढवणा-या उमेदवारांना बसणार चाप, विधी आयोगाची महत्त्वाची शिफारस !

एकापेक्षा अधिक मतदारसंघातून निवडणुका लढवणा-या उमेदवारांना बसणार चाप, विधी आयोगाची महत्त्वाची शिफारस !

मुंबई – एकापेक्षा अधिक मतदारसंघातून निवडणुका लढवणा-या उमेदवारांना आता चाप बसणार आहे. विधी आयोगानं याबाबत महत्त्वाची शिफारस केली असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघांतून निवडून येणारे आणि नंतर एका मतदारसंघाचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लादणाऱ्या उमेदवारांकडून त्या निवडणुकीचा खर्च वसूल केला जाणार आहे. या संदर्भातील महत्त्वाची शिफारस विधी आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला केल्याची माहिती आहे.

दरम्यान केंद्रीय विधी आयोगाने आतापर्यंत निवडणूक आयोगाला निवडणूक बदलासंदर्भात तीन अहवाल सादर केले आहेत. यामध्ये घटनेतील तरतुदीनुसार लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काही उमेदवार एकापेक्षा जास्त मतदारसंघांतून निवडणूक लढवतात. व दोन मतदारसंघांतून निवडून आल्यास एका मतदारसंघातील लोकप्रतिनिधित्वाचा राजीनामा विजयी उमेदवार देतो. त्यामुळे तेथे पोटनिवडणूक घ्यावी लागते. या वेळी आयोगाची सर्व यंत्रणा पुन्हा कामाला लागते आणि निवडणुकीसाठी दुसऱ्यांदा खर्च होतो. त्यामुळे हा सर्व खर्च राजीनामा देणा-या उमेदवारावरच लादण्याची शिफारस करण्यात आली आहे.

 

COMMENTS