खासगी वाहिन्यांनी ‘दलित’ शब्द वापरु नये – केंद्र सरकार

खासगी वाहिन्यांनी ‘दलित’ शब्द वापरु नये – केंद्र सरकार

नवी दिल्ली – खासगी वाहिन्यांनी दलित शब्द न वापरण्याच्या सूचना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर ही सूचना देण्यात आली आहे. दलित शब्दाऐवजी अनुसूचित जाती असा शब्दप्रयोग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे खासगी वाहिन्यांना दलित शब्द वापरता येणार आहे.

दरम्यान दलित शब्दाचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला जावा आणि याबाबतचे निर्देश सर्व वाहिन्यांना देण्याबाबत विचार केला जावा असं खंडपीठाने म्हटलं होतं. त्यानुसार सात ऑगस्ट रोजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सर्व खासगी वाहिन्यांना ‘दलित’ शब्दाचा वापर खासगी वाहिन्यांनी करु नये असं पत्र पाठवलं आहे.

 

COMMENTS