महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात ‘आप’ च्या धनंजय शिंदे यांची पोलिसात तक्रार !

महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात ‘आप’ च्या धनंजय शिंदे यांची पोलिसात तक्रार !

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांच्याविरोधात आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. आदेश गुप्ता यांनी निषेधार्ह ट्विट केलं असून या ट्विटमध्ये त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देत या दिनाला ‘हिंदू साम्राज्य दिवस’ घोषित करून त्याच्याही शुभेच्छा दिल्या असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी भाजप नेते व तत्कालीन दिल्ली प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केले गेले होते. यावरही शिंदे यांनी टीका केली असून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचा कुटील डाव दिल्लीतून सातत्याने रचला जात आहे हे यामधून स्पष्ट होत असल्यांही शिंदे म्हणाले आहेत. याबाबत धनंजय शिंदे यांनी संबंधित भाजप नेत्यावर ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 505(2), 153 A व 298 या कलमांतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी यात करण्यात आली आहे.

भाजप नेत्याच्या या भूमिकेचा विरोध म्हणून आज दिवसभर *#छत्रपती_शिवाजी_महाराज_द्रोही_भाजप* हे हॅशटॅग वापरून अनेक शिवप्रेमी ट्विटरवर व्यक्त होत आहेत. अशा प्रकारची बदनामी करणाऱ्या दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्षावर भारतीय जनता पक्षाने त्वरित कारवाई करावी व त्याला बाहेरचा रस्ता दाखवावा असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान एकामागून एक मराठी मनात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेल्या अभिमानाच्या, आदराच्या भावनेचा गैरवापर होत असून भाजप स्वत:चे विखारी जातीयवादी, धर्मवादी राजकारण पुढे रेटत आहेत. यामुळे समाजमनात गोंधळ निर्माण होत असून वातावरण कलुषित होत आहे त्यामुळे आम आदमी पार्टी या घटनेचा निषेध करत असून संबंधित भाजप नेत्याने याबाबत जाहीर माफी मागावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

COMMENTS