‘या’ मतदारसंघात काँग्रेसचा मित्रपक्षांना पाठिंबा !

‘या’ मतदारसंघात काँग्रेसचा मित्रपक्षांना पाठिंबा !

मुंबई – या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार्‍या महाराष्ट्रातील  विधान परिषदेच्या चार जागांच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी मित्र पक्षांच्या उमेदवारास पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.महाराष्ट्रामध्ये 25 जून रोजी विधान परिषदेच्या चार जागांसाठी  निवडणूक होत आहे. या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मताचे विभाजन होऊन याचा फायदा जातीयवादी पक्षांना होऊ नये यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मित्रपक्षांच्या उमेदवारांना काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे.

कोकण विभाग विधान परिषद मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला, मुंबई शिक्षक विधान परिषद मतदार संघात लोकतांत्रिक जनता दल (शरद यादव गट) चे उमेदवार कपील पाटील, मुंबई पदवीधर विधान परिषद मतदार संघात शेकापचे उमेदवार अ‍ॅड.राजेंद्र कोर्डे व नाशिक विभाग शिक्षक विधान परिषद मतदार संघातून महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ)चे उमेदवार संदीप बेडसे यांना काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. तरी मित्रपक्षांच्या या उमेदवारांना काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य  करुन त्यांना विजयी करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

COMMENTS