शरद पवारांना काँग्रेसची ऑफर ?

शरद पवारांना काँग्रेसची ऑफर ?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसनं ऑफर दिली असल्याची माहिती आहे. याबाबतचे वृत्त झी चोवीस तासनं दिले असून शरद पवार यांना आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसनं ऑफर दिली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी शरद पवार यांना सहभागी करुन घेतलं जाणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी सोनिया गांधी यांनी देशभरातील सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करण्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये शरद पवारही सहभागी झाले होते. त्यानंतर आता चक्क शरद पवार यांना काँग्रेसमध्ये सहभागी करुन घेतलं जाणार असल्यामुळे आगामी काळात राजकीय वातावरणात मोठे बदल होणार असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान आघाडीचं नेतृत्व शरद पवारांच्या हाती सोपवायला सोनिया गांधी तयार झाल्या असतील तर देशाचं राजकारण एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपलं असल्याचं दिसत आहे. परंतु काँग्रेसची ही ऑफर शरद पवार मान्य करणार आहेत का? हे जुळून येण्यासाठी काँग्रेसकडून काय केलं जाणार आहे. हे काही दिवसात समोर येणार आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय घडामोडीमध्ये नेमके काय बदल होतील यावरच सध्या तर्कवितर्क लढविले जात आहेत.

 

COMMENTS