प्रकाश आंबेडकरांच्या सर्व अटी मान्य, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फोनवरून केली चर्चा !

प्रकाश आंबेडकरांच्या सर्व अटी मान्य, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फोनवरून केली चर्चा !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु प्रकाश आंबेडकरांचे मन वळवण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रयत्न केला जात आहे. याबाबत आंबेडकरांशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फोनवरून चर्चा केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी फोनवरुन प्रकाश आंबेडकरांशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत सामील होण्याचं आवाहन केलं आहे. चयतसेच आंबेडकरांच्या सर्व अटी मान्य करण्याची काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं तयारी दर्शवली आहे. यापूर्वीही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंबेडकरांची भेट घेतली होती. परंतु कयआघाडीनं काही अटी मान्य केल्या नसल्यामुळे त्यांनी आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता अटी मान्य केल्यानंतर प्रकाश आंबेडकर आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS