अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा – काँग्रेस

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा – काँग्रेस

मुंबई – अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा झाला असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीनं आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. शिवस्मारकाच्या कामातील अनियमितता आणि गैरव्यवहाराबाबत कॅगच्या अधिकाऱ्यांनीच तक्रार केली असून शिवस्मारकातील गैरव्यवहाराबाबत विभागीय लेखापालांनी लिहलेले पत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उघड केलं आहे. प्रकल्पाची एक वीटही न रचता 80 कोटी रुपये खर्च केले गेले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान हे पैसे देण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोपही अधिकाऱ्यांनं लेखी पत्रात केला असल्याचं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. सरकारने शिवस्मारकाची 121.2 मीटर उंची कायम ठेवताना पुतळ्याची उंची कमी केली आणि तलवारीची उंची वाढवली. स्मारकाची जागाही कमी करण्यात आली. टेंडर दिल्यानंतर कामात बदल करता येत नाहीत, मात्र शिवस्मारकाच्या कामात बदल केले गेले. हे करताना तांत्रिक समितीची परवानगीही घेतली नाही. 2 जूनला या विभागाच्या लेखापालाने आपल्या हस्ताक्षरात एक नोट लिहिली आहे. शिवस्मारकात झालेली वाटाघाटी ही मार्गदर्शक तत्वांना धरून नसून शिवस्मारकाचे काम सुरू राहीले तर हलक्या प्रतीचं काम होईल अशी या नोटमध्ये भीती व्यक्त केली असल्याचंही या नेत्यांनी म्हटलं आहे

तसेच निविदेच्या अटी व शर्तीचा भंग केल्याचं नोटमध्ये स्पष्ट म्हटलं आहे. कंत्रादाराला पैसे देण्यात सरकारचा दबाव होता. आतापर्यंत 80 कोटी रुपये खर्च झालेला आहे. शिवस्मारकाच्या कामात झालेल्या अनियमितता बघता हा प्रकल्प पुढे रेटावा की नाही असा माझ्यापुढे गहन प्रश्न आहे, अशी नोट अधिकाऱ्यांनी लिहिली असल्याचं काँग्रेस-राष्टेरवादीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. तसेच याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केली आहे. या अनियमितेची चौकशी व्हावी यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाला पत्र लिहणार असून या अनियमितेत केवळ अधिकार सहभागी नाहीत तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोपही काँग्रेस-राष्ट्रवादीने केला आहे.

COMMENTS