काँग्रेस-राष्ट्रवादीत 10 जागांवरून मतभेद, काँग्रेस 5 तारखेला जाहीर करणार उमेदवारांची पहिली यादी!

काँग्रेस-राष्ट्रवादीत 10 जागांवरून मतभेद, काँग्रेस 5 तारखेला जाहीर करणार उमेदवारांची पहिली यादी!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सध्या जागावाटपावर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. परंतु या जागावाटपात दोन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत 10 जागांवरून मतभेद असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 10 मतदारसंघावर मतभेद आहेत त्या मतदारसंघाविषयी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यात येणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान राष्ट्रवादीसोबत 106 जागांवर बोलणी झाली असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. तसेच येत्या 05 तारखेला काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे पहिल्या यादीत कोणत्या नेत्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत याबाबतची उत्सुकता काँग्रेस नेत्यांना लागली आहे.

COMMENTS