छत्तीसगडमधील काँग्रेसच्या ‘या’ नवीन मंत्र्याला येत नाही लिहिता-वाचता, एकदाही गेले नाहीत शाळेत !

छत्तीसगडमधील काँग्रेसच्या ‘या’ नवीन मंत्र्याला येत नाही लिहिता-वाचता, एकदाही गेले नाहीत शाळेत !

नवी दिल्ली – छत्तीसगढचे काँग्रेसचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार केला आहे. या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये ९ मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. या 9 मंत्र्यांपैकी एका मंत्र्याला लिहिता, वाचता येत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कवासी लकमा असं या मंत्र्याचं नाव असून ते एकदाही शाळेत गेले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या मंत्र्याची देशभरात सध्या चर्चा रंगली आहे.

दरम्यान लकमा यांना राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी शपथ दिली. या शपथविधीदरम्यान त्यांना लिहिता, वाचता येत नसल्याचं समोर आलं. नेहम शपथविधीदरम्यान राज्यपाल सुरुवातीचा एक शब्द उच्चारतात. त्यानंतर संपूर्ण शपथ तो मंत्री घेत असतो. परंतु असं न करता राज्यपालांनी वाक्य पूर्ण केल्यानंतर लकमा वाक्य म्हणत होते. राज्यपालांनी म्हटलेलं एक एक वाक्य त्यांच्या मागून उच्चारत लकमांनी आपली शपथ पूर्ण केली. त्यामुळे त्यांच्या शपथविधीदरम्यान चांगलीच चर्चा रंगली होती.

लकमा यांचा सुकमा जिल्ह्यातल्या नागारास या गावामध्ये १९५३ साली जन्म झाला. सुकमामधील हा भाग अतिशय दुर्गम आणि मागासलेला असल्यामुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही. परंतु मला लिहिता वाचता येत नसलं तरी देवाने अशी बुद्धी दिली की निर्णय घेताना कुठलीही अडचण येत नाही. म्हणूनच गरिबांसाठी काम करताना मला कोणतीही अडचण येणार नसल्याचं लकमा यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS