भर कार्यक्रमात आमदारानं बांधल्या काँग्रेस नेत्याच्या बुटाच्या नाड्या !

भर कार्यक्रमात आमदारानं बांधल्या काँग्रेस नेत्याच्या बुटाच्या नाड्या !

नवी दिल्ली – काँग्रेस आमदारानं भर कार्यक्रमात आपल्या नेत्याच्या बुटाच्या नाड्या बांधल्या असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या बुटाच्या नाड्या आमदार रणजिस सिंग यांनी बांधल्या असल्याचं दिसत आहे. परंतु कमलनाथ मला वडिलांसारखे असून शाळेत शिकत असल्यापासून त्यांच्याविषयी आपल्या मनात मोठा आदर आहे. आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पायाला आपण स्पर्श केला. माझ्या परिवाराशी विशेषत: वडिलांशी त्यांचे घनिष्ट संबंध आमदार रणजिस सिंग यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सार्वजनिक कार्यक्रमात हा प्रसंग घडला असून याबाबत आमदार सिंग यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. परंतु ज्येष्ठ नेत्याप्रती आपण आदर व्यक्त केला असल्याचं स्पष्टीकरण आमदार सिंह यांनी दिले आहे. हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेते उर्मिला सिंग यांच्या अभिवादन कार्यक्रमात हा प्रसंग घडला आहे. उर्मिला सिंह यांना अभिवादन करताना खोलीत अनेक माणसे होती. त्यावेळी कमलनाथ यांना त्यांचे बुटाचे जोड शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाली होती. त्यामुळे आपण त्यांना मदत केली. माध्यमांनी आपल्या कृतीचा चुकीचा अर्थ लावला असल्याचं वक्तव्य सिंह यांनी केलं आहे.

COMMENTS