भाजप सरकारच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा व्हिडीओ, जनसंघर्ष यात्रेत सहभागी होण्याचं अशोक चव्हाणांचं आवाहन ! VIDEO

भाजप सरकारच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा व्हिडीओ, जनसंघर्ष यात्रेत सहभागी होण्याचं अशोक चव्हाणांचं आवाहन ! VIDEO

मुंबई – भाजप सरकारच्या कारभाराविरोधात काँग्रेसनं व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये राज्यातील प्रश्नांबाबत राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता, पण प्रगतीशील महाराष्ट्र बनलाय एक मागासलेलं अस्वस्थ राज्य. नियोजनशून्य धोरणांमुळे उद्योजक, शेतकरी, सामान्य नागरिक हवालदील झालेत. बेरोजगारी- गुन्हेगारीही वाढली. आता राज्यातल्या जनतेचा एकच निर्धार, महाराष्ट्राला बदलायचय हे नाकर्ते सरकार. असं या व्हिडीओमध्ये काँग्रेसनं म्हटलं आहे.तसेच काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

COMMENTS