शिवस्मारकाच्या कामाचा मार्ग मोकळा, लवकरच सुरु होणार काम !

शिवस्मारकाच्या कामाचा मार्ग मोकळा, लवकरच सुरु होणार काम !

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला असून आता लवकरच या स्मारकाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या स्मारकाचे कंत्राट एल ऍण्ड टी कंपनीला देण्यात आलं आहे. विधीमंडळमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी ही  घोषणा केली असून या प्रकल्पाचा पहिला टप्पा 36 महिन्यात पूर्ण केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एल ऍण्ड टी कंपनीला हे कंत्राट देण्यात आलं असून त्यावेळी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आणि विनायक मेटे देखील उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी सर्व परवानग्या मिळाल्या असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली असून या स्मारकाची जागा राजभवनापासून 1.2 किमी ,गिरगाव चौपटीपासून 3.6 किमी व नरिमन पॉइंटपासून 2.6 किमी अंतरावर असणार आहे. तसेच समुद्रात 6.8 हेक्टर बेटावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 210 मी उंचीचा पुतळा  उभार राहणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची किंमत 2500 कोटी  + जीएसटी  एवढी असणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली आहे.

COMMENTS