३ ते ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्सची सूट?

३ ते ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्सची सूट?

नवी दिल्ली – आगामी लोकसभा आणि काही राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांना टॅक्समध्ये सूट देण्यात येणार आहे. पुढील महिन्यात सादर होणाऱ्या मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर वजावटीची मर्यादा विस्तारण्याचे निश्चित होत आहे. प्राप्तिकर वजावटीची सध्याची २.५० लाख रुपये ही वार्षिक मर्यादा आहे. परंतु यावर्षीपासून ३ ते ५ लाख रुपये करण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारकडून याबाबतचा निर्णय १ फेब्रुवारीला सादर करण्यात येणा-या अर्थसंकल्पात घेतला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान या अर्थसंकल्पात प्राप्तिकर वजावटीची मर्यादा विस्तारण्यासह सध्याच्या कर टप्प्यातही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा लाभ मोठय़ा संख्येत असलेल्या पगारदार मध्यमवर्गाला मिळणार आहे. वाढत्या महागाईमुळे या वर्गाला दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत असले तरी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच याबाबतची पावले उचलली जात असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS