विधानसभा पोटनिवडणूक निकाल – बिहारमध्ये आरजेडी तर उत्तर प्रदेशात सपाचा विजय !

विधानसभा पोटनिवडणूक निकाल – बिहारमध्ये आरजेडी तर उत्तर प्रदेशात सपाचा विजय !

मुंबई – देशभरातील चार लोकसभा आणि विधानसभेच्या 10 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. विधानसभा पोटनिवडणुकीतील बिहार आणि उत्तर प्रदेशचा निकाल हाती आला असून बिहारमध्ये आरजेडीचा विजय झाला आहे. तर उत्तर प्रदेशात सपाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. उत्तर प्रदेशात  नूरपूरमध्ये सपाचे नईम उल हसन यांचा 6211 मतांनी विजय झाला आहे. तर बिहारमध्ये आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी जनतेला धन्यवाद दिले असून भाजप आणि नितीश कुमार यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. बिहारमधील जनात लालूजींच्या सोबत असल्याचं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. तर मेघालयात काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला असल्याची माहिती आहे.

कोणत्या मतदारसंघातून कोण आघाडीवर

झारखंड – गोमिया, सिल्ली भाजप 7174 मतांनी आगाडीवर

उत्तर प्रदेश – नूरपूर – सपाचे नईम उल हसन यांचा 6211 मतांनी विजय

पंजाब – शाहकोट – काँग्रेस 18000 हजार मतांनी आघाडीवर

बिहार – जोकीहाट  – आरजेडीचा विजय

केरळ – चेनगन्नूर – सीपीआय 9359 मतांनी आघाडीवर

महाराष्ट्र – पलूस-कडेगाव – काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम हे बिनविरोध विजयी

मेघालय – अंपाती – काँग्रेस आघाडीवर

उत्तराखंड – थराली – भाजप आघाडीवर

प. बंगाल – महेशतला – टीमसीचे दुलाल चंद्रदास आघाडीवर, 3300 मतांनी आघाडीवर

कर्नाटक – काँग्रेसचे मुनीरत्न 44000 मतांनी आघाडीवर

 

COMMENTS