कोट्यधीश खासदारांचा पगार थांबवा, वरूण गांधी यांची मागणी !

कोट्यधीश खासदारांचा पगार थांबवा, वरूण गांधी यांची मागणी !

नवी दिल्ली – भाजप खासदार वरूण गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून खासदारांच्या पगार वाढीला विरोध केला आहे. त्याशिवाय कोट्याधीश असलेल्या खासदारांनी तर पगारच घेऊ नये, अशी विनंतीही वरूण गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. सर्वच पक्षाचे खासदार पगारवाढीची मागणी करत असताना भाजपच्याच वरूण गांधी यांनी विरोध केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान सोळाव्या लोकसभेत ४४० खासदार कोट्याधीश असून लोकसभेतील प्रति खासदारांची संपत्ती १४.६१ कोटी आहे. तसेच राज्यसभेतेतील प्रति खासदारांची संपत्ती २०.१२ कोटी असून कोट्यधीश असलेल्या या खासदारांचा पगार थांबवायला हवा. त्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी पुढाकार घेऊन खासदारांना विनंती करावी अशी मागणी वरुण गांधी यांनी केली आहे.

तसेच याबाबत एक संविधानिक समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली असून ही समिती वेळोवेळी खासदार आणि आमदारांचा किती पगार असावा आणि कधी वाढ करावी, यासंदर्भात निर्णय घेईल असंही ते म्हणाले आहेत. १९४९ मध्ये देशाच्या आर्थिक परिस्थितीमुळे पंडित नेहरू कॅबिनेटने ३ महिने पगार घेतला नव्हता त्याचप्रमाणे या खासदारांनीही पगार घेऊ नये असं वरुण गांधी म्हणाले आहेत.

 

COMMENTS